रहिवासी संघटनेचे पनवेल शहर पोलिसांना निवेदन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण नाका रहिवासी संघटनेतर्फे उरण नाका येथे पोलीस चौकी उभारण्यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
या वेळी संघटनेच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्याशी चर्चा करून त्यांना परिसरातील विविध समस्यांबाबत सांगितले, तसेच उपाययोजना करण्याची मागणी केली. या वेळी संघटनेचे राहुल केदारे, मंगेश पिलविळकर, अभिजित तुरकर, प्रगती गायकवाड, निलेश बुरकर, विद्या चव्हाण, अर्वाह टीनवाला, रशिदा कागलवाला, तसनीम कंटावाला, अलेफीया बिजलीवाला, कैझार मालक, जुमाना सलीम, मंगला गंजी आणि परिसरातील इतर रहिवासी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper