Breaking News

फायनलच्या आधी रोहित तिरुपती बालाजीच्या चरणी

तिरुपती : वृत्तसंस्था

2019 सालच्या आयपीएलची फायनल 12 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. यासाठी मुंबईची टीम हैदराबादमध्ये दाखल झाली आहे, पण मुंबई टीमचा कर्णधार रोहित शर्मा हा त्याची पत्नी आणि मुलीसह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेला होता. रोहित शर्माबरोबरच भारतीय टीमचा खेळाडू दिनेश कार्तिकनेही बालाजीचं दर्शन घेतलं.

7 मे रोजी चेन्नईविरुद्ध झालेल्या पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये मुंबईने चेन्नईचा पराभव केला. यामुळे मुंबईने थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवला, तर एलिमिनटेर मॅचमध्ये दिल्लीने हैदराबादला पराभूत केलं. यामुळे आता चेन्नई आणि दिल्ली यांच्यामध्ये क्वालिफायरचा दुसरा सामना खेळवण्यात येईल. या मॅचमध्ये ज्यांचा विजय होईल, ती टीम फायनलमध्ये मुंबईविरुद्ध खेळेल.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply