Breaking News

नागोठण्यात ग्रंथपाल दिनानिमित्त व्याख्यान

नागोठणे : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय युवा दिन व ग्रंथपाल दिनानिमित्ताने  कोएसोच्या नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात पनवेल येथील सीकेटी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. रमाकांत नवघीरे यांचे ग्रंथालय ई-सोर्सेस व एनलिस कार्य प्रणाली या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  प्रा. रमाकांत नवघीरे यांनी विद्यार्थी व महाविद्यालयीन  शिक्षक सहकार्‍यांना ग्रंथालयात उपलब्ध असणार्‍या विविध ऑनलाइन डेटाबेस सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यात राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी, खडज-30 प्रणाली, साय अ‍ॅप, डेडासॉल्ट्स, जढझ प्लेटफॉर्म, नटफेक्स, नेचर डॉटकॉम, व्हर्चुअल लॅब, स्पोकन टीटोरियल आदि ऑनलाइन व ऑफलाइन ग्रंथालय सामुग्रीबद्दलच्या माहितीचा समावेश होता.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. हेमंत जाधव यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. निवेदिता म्हात्रे यांनी करून दिली. प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम समन्वयक  प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, प्रा. डॉ. दिनेश भगत, डॉ. विलास जाधवर यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला. महाविद्यालय ग्रंथपाल समिती सदस्य डॉ. विजय चव्हाण, प्रा. जयेश पाटील, डॉ. मनोहर सिरसाट, डॉ. विकास शिंदे, रूचिता निकम यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply