मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (दि. 16) झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध घोषणा केल्या. त्यानुसार दहीहंडी पथकातील गोविंदांना 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. शासनाने विमा कवच द्यावे, अशी गोविंदा पथकांची मागणी होती. या मागणीनुसार शासनाकडून गोविंदांना 10 लाखांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या एसटी बसेसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे राज्य शासकीय कर्मचार्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे राज्य शासकीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता 31वरून 34 टक्के होणार आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper