कर्जत : बातमीदार
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कर्जत पंचायत समिती आणि तालुका बचत गट समन्वय समिती यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने कडाव आणि नेरळ येथे महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तालुक्यातील 61 बचत गटांनी या प्रदर्शनात स्टॉल लावले होते. नेरळ येथील बापूराव धारप सभागृहात तहसीलदार विक्रम देशमुख आणि गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. नेरळ सरपंच उषा पारधी, पंचायत समितीच्या बचत गट ग्रामीण जीवनज्योती अभियान समन्वयक ललिता तेलवणे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसले यांच्यासह बचत गटांच्या सीआरपी प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. या प्रदर्शनात तब्बल 46 महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यात मसाल्याचे पदार्थ, साठवणीचे पदार्थ, कुरडई, पापड, लोणची, हातमाग वस्त्र, चामड्याच्या चपला आदींसह खाद्य पदार्थांचा समावेश होता. आदिवासी महिला बचत गटाने या प्रदर्शनात रानभाज्यांचे स्टॉल लावले होते, कडाव येथील बाल दिगंबर मंदिरात आयोजित केलेल्या प्रदर्शनात 16 स्टॉल लावण्यात आले होते. या दोन्ही प्रदर्शनस्थळी आमदार महेंद्र थोरवे यांनी भेटी दिल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper