Breaking News

माणगावात ग्रंथ पारायण

माणगाव : रामप्रहर वृत्त

जगद्गुरू नरेंद्राचार्याजी महाराज व प. पू. कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दक्षिण रायगड ज़िल्ह्यात श्रावण महिन्याचे आचित्य साधून श्री लिलामृत ग्रंथ पारायण सोहळे आयोजित केले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून माणगाव येथील सेवाकेंद्रात मंगळवारी (दि.16) श्री लिलामृत ग्रंथाचे एक दिवशीय पारायण करण्यात आले. जगद्गुरू नरेंद्राचार्याजी महाराज संस्थानच्या माणगाव सेवाकेंद्रात मंगळवारी सकाळी 10 वाजता श्री स्वामीचा नामगजर व धूपारती करण्यात आली त्यानंतर श्री लिलामृत ग्रंथाच्या पारायणास सुरूवात झाली. सेवा केंद्रामधील 15 साधकांनी पारायण केले,  या वेळी 35 ते 40 भक्तगण उपस्थित होते. संस्थानचे रायगड जिल्हा  ज़िल्हा सचिव भरत थीटे आणि प्रसिध्दी प्रमुख जितेंद्र दोशी यांनी या पारायणास भेट दिली. संस्थानचे ज़िल्हा निरीक्षक सुनील वीर, ज़िल्हाअध्यक्ष सुधीर पुळेकर, ज़िल्हा आधात्मिक प्रमुख प्रवीण मोरे, तालुका अध्यक्ष गुरुनाथ कामत, महिला अध्यक्ष  योगिता धाडवे, अंजली जगताप यांनी या पारायणाकरिता मार्गदर्शन व सहकार्य केले. सेवाकेंद्र अध्यक्ष निकिता धाडवे, संतोष पोतदार, युवराज सरडे, प्रकाश मेहता यांनी या पारायणाकरिता विशेष कार्य केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply