भाजप अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष विकास सोरटे यांची मागणी
नवी मुंबई ः बातमीदार
वाशी विभागातील सेक्टर 9 व 10 येथे होऊ घातलेल्या इमारत पुनर्विकास प्रकल्पांतर्गत होणार्या कामामुळे विभागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हे काम सुरू असलेल्या विभागात नवी मुंबईतील शाळा, कॉलेज व हॉस्पिटलही आहे, मात्र ऐन शाळेच्या वेळी या इमारतीतून बांधकाम साहित्य व राडारोडा घेऊन जाणारे ट्रक रहदारी करीत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अवजड वाहनांसाठी निश्चित वेळ ठरवावी व शाळेच्या वेळी बंदी घालावी, अशी मागणी भाजपचे अनुसूचित जाती जमातीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विकास यांची यांनी आयुक्तांकडे केली आहे.
विभागातील रहिवाशांसोबतच शाळा, कॉलेजमध्ये येणारे विद्यार्थी, पालक, हॉस्पिटलमध्ये येणार्या रुग्णांना याचा नाहक सोसावा लागत आहे, तसेच सदर पुनर्विकास प्रकल्पामुळे शाळा भरताना व सुटताना अवजड वाहनांची सातत्याने ये- जा सुरू असते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सध्या पावसाचे असल्याने या विभागात रस्त्यांवर झालेला चिखलही होत आहे. त्यामुळे शाळांच्या वेळेत म्हणजे सकाळी 6.45 ते 7.30, दुपारी 12 ते 1.30 आणि सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत अवजड वाहनांस रहदारीस मनाई करावी, अशी मागणी विकास सोरटे यांनी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper