विकासाबरोबरच कायदा सुव्यवस्थाही अबाधित राहिली पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर

उलवे नोडमधील नवीन पोलीस चौकीचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

विकासाबरोबरच कायदा सुव्यवस्थाही अबाधित राहिली पाहिजे, असे प्रतिपदन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 6) केले. उलवे नोड सेक्टर 10 येथे नवीन पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या चौकीचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील न्हावा शेवा पोलीस ठाणे अंतर्गत उलवे नोड सेक्टर 10, प्लॉट 76 येथे नवीन पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या चौकीच्या उद्घाटन सोहळ्यास उद्योजक जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्य योगिता भगत, सुहास भगत, वसंतशेठ पाटील, कोपर अध्यक्ष किशोर पाटील, जयवंत देशमुख, युवा नेते साईचरण म्हात्रे, सुधीर ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. निकम, अमोल शिंद, श्री. परचाके, हवालदार श्री. पवार, श्री. भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, उलवे नोड परिसराचा विकाी होत आहे, मात्र हा विकास होत असताना कायदा सुव्यवस्थाही अबाधित राहायला पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे आणि यासाठी तुम्हाला जे सहाकार्य लागेल ते आम्ही करू.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply