Breaking News

उरणमध्ये वायूविद्युत निर्मिती केंद्रात स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे गंभीररित्या जखमी

उरण ः प्रतिनिधी, बातमीदार

बोकडविरा येथील वायूविद्युत निर्मिती केंद्रात बॉयलरच्या पंपाचा भीषण स्फोट झाल्याने झालेल्या या दुर्घटनेत एका जुनियर इंजिनियरसह दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचरानंतर त्यांना अधिक उपचारासाठी नवी मुंबईत नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान एकाचा कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 9) दुपारच्या सुमारास घडली. सुटीचा दिवस असल्याने कामगारांची विशेष वर्दळ नव्हती, मात्र वायूविद्युत निर्मिती संच सुरू असल्याने काही मोजके कामगार कामावर हजर होते. दुपारी 12 ते 12:30 वाजण्याच्या सुमारास येथील बॉयलर विभागात काम सुरू असतांना बॉयलरमधील दाब अचानकपणे वाढला. त्यामुळे बॉयलरला जोडलेला बीसीसी पंप दाब सहन न करू शकल्याने या पंपाचा जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज अतिशय भयानक होता. मिळालेल्या माहितीनुसार या बॉयलरचे दर 25 वर्षांनी सर्वेक्षण करणे आवश्यक असतांनाही संबंधित खात्याकडून तपासणी करून तशा प्रकारे दाखला न घेतल्याची माहिती उघड झाली आहे. या ठिकाणी काम करीत असलेले जुनियर इंजिनियर विवेक धुमाळे, टेक्निशियन कुंदन पाटील रा. डोंगरी, विष्णू पाटील रा. बोकडविरा हे या झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी उरण येथील इंदिरागांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता प्राथमिक उपचारानंतर दोघांना नवी मुंबईतील ऐरोली येथील रुग्णालयात तर एकाला नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान जुनियर इंजिनियर विवेक धुमाळे यांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाबाबत उरण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply