Breaking News

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी

आशिष शेलार खजिनदार

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची निवड झाली आहे, तर खजिनदारपदाची सूत्रे भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे असणार आहेत. बीसीसीआयच्या मंगळवारी (दि. 18) मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
1983च्या वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष म्हणून माजी कर्णधार सौरव गांगुलीची जागा घेतली आहे. उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला असतील. सचिवपदी जय शाह यांना कायम ठेवण्यात आले आहे. सहसचिवपदी देवाजीत सैकिया, तर खजिनदार म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पेशाने वकिल असलेले आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत. ते जून 2015मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनवर सदस्य म्हणून निवडून गेले. त्यानंतर मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या चेअरमनपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. राजस्थान स्पोर्ट्स क्लबचे ते उपाध्यक्ष होते. 12 जानेवारी 2017मध्ये ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते. आता त्यांच्याकडे जगातील सर्वांत श्रीमंत मंडळ असलेल्या बीसीसीआयच्या तिजोरीच्या चाव्या असतील.
बीसीसीआयची नवी टीम
अध्यक्ष : रॉजर बिन्नी (कर्नाटक), सचिव : जय शाह (गुजरात), उपाध्यक्ष : राजीव शुक्ला (उत्तर प्रदेश), खजिनदार : आशिष शेलार (महाराष्ट्र), सरचिटणीस : देवाजित सैकिया (आसाम), आयपीएल चेअरमन : अरुण धुमाळ (हिमाचल प्रदेश).

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply