तारापूर ः प्रतिनिधी
तारापूर येथील एमआयडीसीतील केमिकल कंपनीत झालेल्या वायुगळतीने तीन कामागारांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरू असताना विषारी वायूची गळती झाल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या कामगारांची तपासणी करताना संबंधित डॉक्टरांनाही वायूची लागण झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एस्क्वायर (र्र्शीिींळीश) केमिकल कंपनीत (प्लॉट क्र. एन 60) रासायनिक प्रक्रिया करताना वायुगळती झाल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर या कामगारांना औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रुग्णालयात आणल्यानंतर संबंधित रासायनिक वायूचा रुग्णालयातील इतरांनाही त्रास जाणवू लागला. कामगारांच्या मृतदेहाची तपासणी करीत असताना डॉक्टरांनाही चक्कर आल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper