Breaking News

विविध दिवाळी अंकांचे प्रकाशन

धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त

धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्या अनुषंगाने यंदाचा रायगड शिव सम्राट दिवाळी अंक आरोग्य विषयक असून त्याचा फायदा वाचकांना होईल, असे प्रतिपादन  भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले. पनवेल येथून प्रकाशित होणार्‍या सा. रायगड शिव सम्राट वृत्तपत्राच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी (दि. 22) सायंकाळी झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी नगरसवेक मनोज भुजबळ, राजू सोनी, मोतीलाल कोळी, सा. रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, प्रतिनिधी सुभाष वाघपंजे आदी उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे म्हटले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आपण सर्व वाटचाल करीत आहोत. रत्नाकर पाटील हे गेली अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षी विविध सामाजिक विषयाला अनुसरून त्यांचा दिवाळी विशेषांक प्रकाशित होत असतो. यावर्षी त्यांनी आरोग्य विषयक माहिती आपल्या अंकातून लोकांपर्यंत पोहचविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. आजार सांगून येत नसतो पण त्याच्या संदर्भात काळजी घेणे जरुरी आहे. त्या अनुषंगाने या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी या वेळी अधोरेखित केले. तसेच दिपावलीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

मुंबई : उरण येथून नियमित प्रकाशित होणार्‍या साप्ताहिक झुंजार मतच्या 26व्या वर्षीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन पॉप्युलर ऑफसेट प्रिंटिगच्या कार्यालयात झाले. पॉप्युलर ऑफसेटचे मालक अंकुश उकार्डे, विवेक उकार्डे, संपादक अजित पाटील आणि पराग उकार्डे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा साजरा झाला. सहसंपादिका मिनाक्षी अजित पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

नवी मुंबई : आहुतिचा 56व्या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन शुक्रवारी  अतिथी संपादक आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते त्यांच्याच कार्यालयात करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, पत्रकार प्रशांत मोरे, चंद्रशेखर भुयार, सागर नरेकर, माया योगेश त्रिवेदी, संपादक गिरीश वसंत त्रिवेदी, कार्यकारी संपादक मनिषा गिरीश त्रिवेदी, चिंतन गिरीश त्रिवेदी, रिंकू चिंतन त्रिवेदी आणि वेद प्रशांत त्रिवेदी उपस्थित होते.

लिमये वाचनालयात दिवाळी अंकांचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

के. गो. लिमये वाचनालयात 2022 च्या दिवाळी अंकांचे डॉ. मधुकर आपटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. सुनिता जोशी, कार्याध्यक्ष विनायक वत्सराज, कार्यकारी सदस्य हिमालिनी कुलकर्णी, अ‍ॅड. माधुरी थळकर, सुनील खेडेकर,  रमेश चव्हाण, संस्थेचे वाचक सभासद दत्तात्रेय जाधव तसेच अनेक वाचकांच्या उपस्थितीत दिवाळी अंकाचे उद्घाटन झाले.

संस्थेच्या आजीव सभासदांना 100 रुपयांत व इतर वाचकांना 300 रुपयांत दिवाळी अंक वाचण्यासाठी मिळतील. दोनशेच्यावर दर्जेदार दिवाळी अंकाचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध असणार आहे. उद्घाटनाच्या प्रसंगी अनेक वाचकांनी दिवाळी अंकांचे सभासदत्व स्विकारले. सकाळी 8.30 ते रात्री 8 या वेळेत सभासदत्व स्विकारले जाईल, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष अ‍ॅड. सुनिता जोशी यांनी केले. तरी जास्तीत जास्त सभासदांनी यांचा लाभ घ्यावा.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply