आमदार महेश बालदी यांच्या निधीतून दिवाबत्तीची सुविधा
पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी आणि भाजपचे युवा नेते मंगेश शेलार यांच्या प्रयत्नांमुळे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली करंजाडे आदिवासीवाडीतील विजेची समस्या सुटली आहे. या वाडीमध्ये दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. हे काम आमदार महेश बालदी यांच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून करण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 28) झाला. करंजाडे वसाहतीपासून दीड किमीवर आदिवासीवाडी आहे. या वाडीत 27 घरे असून या आदिवासी बांधवांची गेल्या दोन वर्षांपासून विजेची समस्या प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते मंगेश शेलार आणि युवा नेते आतिष साबळे यांनी आमदार महेश बालदी यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून आदिवासीवडीत ट्रान्सफॉर्मर बसवून दिवाबत्तीची सोय केली आहे. हे काम 20 लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात आले आहे. या कामाचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या वेळी भाजपचे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, युवानेते मंगेश शेलार, भरत साबळे, अतिष साबळे, अजय साबळे, सूरज शेलार, सागर आंग्रे, विजय आंग्रे, नंदकुमार भोईर, संतोष विखारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper