Breaking News

उरण येथे दीपावली मिलन सोहळा उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती

उरण ः वार्ताहर

दिपावलीनिमित्त उरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षाप्रमाणे यंदा तेरापंथी हॉल वाणीआळी येथे दीपावली मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. आमदार महेश बालदी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शह, व्यापारी भाजप सेल अध्यक्ष हितेश शाह, सेक्रेटरी हस्तीमल मेहता, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, नगरसेवक राजेश ठाकूर, रवींद्र कुलकर्णी, गणेश सेवक, लक्ष्मण सेवक, रायगड जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष जसीन गॅस, मनोज ठाकूर, पुरषोत्तम सेवक, जिगर ठक्कर, दिनेश ठक्कर, पालू भिंडे, डॉ. सुरेश पाटील, डॉ विकास अभिषेक जैन, माजित भाटकर, परबत मेर, उद्योजक निलेश कदम, राजेंद्र पडते, सुनील पेडणेकर, परेश वैवडे, मनन पटेल, अजित भिंडे, मनोहर सहतीया, मधु पेडणेकर, यशवंत गायकवाड, किशोर गायकवाड, मदन कोळी, रोशनलाल मेहता, ताराचंद जैन, अवी जैन, अंशुल जैन, चंद्रकांत ठक्कर, परेश तेरडे, कामेश्वर भट व सदस्य उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply