Breaking News

घारापुरी लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

कोरोना काळानंतर स्थानिकांचे व्यवसाय पुन्हा सुरू

उरण ः रामप्रहर वृत्त
दोन वर्षांच्या कोरोना काळात पर्यटकच नसल्याने जागतिक ख्यातीच्या लेण्या असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावरील स्थानिक नागरिक व व्यवसायिक यांच्यावरही परिणाम झाला होता, मात्र सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर बेटावर दररोज येणार्‍या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिकांचे व्यवसाय पूर्ववत होऊन जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.
कोरोना काळामध्ये दोन वर्षे पर्यटन बंदीमुळे येथील व्यवसाय पूर्णतः बंद झाले होते. यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. करोना काळानंतर व्यवसायाला पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळाल्याने घारापुरी येथील नागरिकांच्या चेहर्‍यावर
आनंद पाहायला मिळत आहे.  मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे घारापुरी बंदर हे येथील लेण्यांमुळे प्रसिद्ध आहे, तर येथील जनजीवन येथे येणार्‍या पर्यटकांवर अवलंबून आहे.
छोट्या दुकानांमधून भेटवस्तू, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, शीतपेय विक्री करून येथील नागरिक आपला उदरनिर्वाह करत असतात, मात्र कोरोना काळामध्ये पर्यटकांना बंदी असल्याने दोन वर्षे येथील व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला होता. यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती, मात्र आता येथील पर्यटन पुन्हा पूर्वपदावर येत असल्याने, येथील नागरिकांचे व्यावसायिक जीवन स्थिरावण्याची
संधी मिळाली आहे.
व्यवसायाला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply