रेवदंडा : प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्ष हा हुकूमशाही व दडपशाही करणारा पक्ष आहे, मात्र आता शेकापचा परतीचा प्रवास सुरू असल्याची टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सोमवारी (दि. 6) रेवदंडा येथे केली. संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मोरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्या वेळी आमदार पाटील बोलत होते.
रेवदंडा येथील नाना नानी पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी, संघटक मयुरेश गंभीर, कामगार नेते दीपक रानवडे, जिल्हा महिला संघटक शुभांगी करडे, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब तेलंगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे, शिवराज्य बिग्रेडचे जिल्हा अध्यक्ष शैलेश चव्हाण, मुरूड तालुका प्रमुख ॠषिकांत डोंगरीकर, निलेश घाटवळ, रोहा तालुका प्रमुख अॅड मनोज शिंदे, उद्देश वाडकर, भगिरथ पाटील, मुरूड-अलिबाग महिला संघटक शिला कडू, अलिबाग तालुका संघटक स्मिता चव्हाण, भारती मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रफुल्ल मोरे समर्थक उपस्थित होते.
सध्याचे सरकार स्थिर असून पुढील काळात विकासाचे अनेक कामे मार्गी लागलेली असतील, असे आमदार पाटील म्हणाले.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper