माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
बंधू भाव, एकात्मता सलोखा आणि शांततेचा संदेश देणारे तसेच शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची 533वी जयंत्ती मंगळवारी (दि. 8) आहे. त्यानिमित्त रविवारी कळंबोली गुरुद्वाराच्या वतीने विशाल नगर किर्तनचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले.
या विशाल नगर किर्तनाला कळंबोली पोलीस निवारा या ठिकाणापासून सुरुवात झाली असून कळंबोली सेक्टर 10 येथील गुरुद्वार्याजवळ सांगता झाली. या वेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक राजू शर्मा, बबन मुकादम, अमर पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, अमर ठाकूर, जमीर शेख, व्यपारी सेल अध्यक्ष कमल कोठारी, शमशेर सिंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper