धाटाव : प्रतिनिधी
रोह्यामध्ये जय नागोबा ग्रुपच्या वतीने सालाबादप्रमाणे जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धचे सोमवारी (दि. 7) करण्यात आले होते. या स्पर्धेत किहीम संघाने बाजी मारत चषकावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेवेळी रोहा तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष विजय मोरे, आयोजक घनश्याम कराळे, जय नागोबा ग्रुपचे प्रवीण जैन, राकेश जैन, विक्रम जैन तसेच कबड्डी असोसिएशनचे जगदिश भगत, सतीश भगत, हेमंत खरिवले, प्रशांत कचरे, संदीप देसाई, रूपेश रटाटे, जयवंत घरत, अलंकार कोटेकर, लक्ष्मण गावंड, आशिष पाटील उपस्थित होते.
स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विनायक दिवलांग, दिलखुश आवास, दत्तात्रेय क्रीडा मंडळ पनवेल, सानेगाव आश्रम रोहा, मिल्लेश्वर किहीम, टाकादेवी मांडवा, श्री. धावीर रोहा, दिवेआगर अशा आठ संघानी सहभाग नोंदवला होता.
श्री धावीर संघ रोहा आणि भिल्लेश्वर किहीम संघात अंतिम लढत झाली. अटीतटीच्या लढतीत किहीम संघाने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकाविला. अंतिम लढत उत्कंठा वाढणारी होती. प्रेक्षकांना रोमहर्षक लढत पहायला मिळाली. पंच म्हणून अमित दळवी, सुजय फुलारे, गणपत भोईर, संदीप जाधव, विनोद पडवळ, प्रदीप जाधव यांनी काम पाहिले. सामने पाहण्यासाठी महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper