Breaking News

शेकापकडून राष्ट्रवादीचा पाणउतारा

माजी नगरसेवक सतीश पाटील यांनी व्यक्त केली नाराजी

कळंबोली : प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाला कोकण शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेतली, मात्र याच शेकापचे काही नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पात्रता काढतात, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतीश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कळंबोलीत आयोजित शरद युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रवादीच्या शरद युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच कळंबोलीतील न्यू इंग्लिश स्कूल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे मेहबूब शेख यांच्यासह पक्षाचे अन्य नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी माजी नगरसेवक सतीश पाटील यांनी आपल्या भाषणात शेकापच्या नेत्यांकडून पनवेल राष्ट्रवादीला डिवचले जात असून आमचा अपमान केला जात असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीच्या मदतीने कोकण शिक्षक मतदारसंघांमध्ये मागील वेळेस शेकापचे बाळाराम पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर आम्ही त्यांना मदत केली, मात्र   शेकापचे काही नेते राष्ट्रवादीला कमी लेखून पाणउतारा करीत असल्याच्या भावना या वेळी सतीश पाटील यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे शेकाप आणि राष्ट्रवादीमधील धुसफूस समोर आली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply