पनवेल : रामप्रहर वृत्त
सी. के. ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यमात इ. 10वीत शिकणार्या श्रावणी दिनेश ठाकूर या विद्यार्थिनीने पनवेल महानगर पालिकेतर्फे आयोजित ज्युडो स्पर्धेत 52 किलोखालील वजन गटात, 17 वर्षाखालील मुलींच्या विभागात सुवर्ण पदक प्राप्त केले आहे, तसेच तिची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
श्रावणी हिला क्रिडा शिक्षक भरत जितेकर, अशोक पाटील, तसेच ज्युडो कोच प्रकाश रिसबुड यांनी मार्गदर्शन केले. श्रावणीचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper