पतीसह सासू व दीरावर गुन्हा दाखल
पेण : प्रतिनिधी
पैशासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी तिचा पती, सासू व दीर यांच्या विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण तालुक्यातील डोलवी येथील महिलेचे 4 मे 2017 रोजी लग्न झाले असून, त्यानंतर 1 ऑगस्ट 2017 ते 9 एप्रिल 2019 या कालावधीत तिचा पती, सासू आणि दीर तिच्याकडून पैशाची मागणी करीत होते. पैसे देण्यास नकार दिला म्हणून तिचा पती, दीर व सासू यांनी संगनमत करून महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला शिवीगाळ, दमदाटी व हाताबुक्याने मारहाण केल्याप्रकरणी तिचा पती, सासू व दीर या तिघांना विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक पाटील करीत आहेत.