Breaking News

उन्हाळी शिबिरात बालगोपाळ रमले

महाड : प्रतिनिधी : अभ्यासाच्या ओझ्यातून मुक्त झालेली शहरातील बच्चे कंपनी आता सुट्टीचा आनंद लूटण्यासाठी वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरात रमले असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणार्‍या मुलांनाही अशा विनामुल्य उन्हाळी शिबिराचा आनंद गट शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्यामुळे मिळाला आहे. आपल्याच शाळेत झालेल्या या शिबीरात मुले आनंदाने रमूनही गेली.

महाडच्या गट शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी जिल्हा परिषद शाळेतच उन्हाळी शिबीराचा उपक्रम राबवला. या शिबीरात विटी-दांडू, गोट्या, लगोरी, फूगड्या असे गावाकडचे खेळ मुले मनसोक्त खेळली. त्याच बरोबरोबर मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा, यासाठी हस्तकला, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी व चित्रकला असे भरपूर उपक्रम राबविण्यात आले. त्यातून मुलांनाही खेळताखेळता  गणिताचे ज्ञान, इंग्रजी संभाषण व नकाशा वाचनही शिकता आले.  शाळेनेही विनामुल्य शिबिर घेतल्याने पालकांचाही प्रतिसाद मिळाला.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply