उरण ः बातमीदार
उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गेटवे डिस्ट्रिपार्कस् लिमिटेड (जीडीएल) या कंपनीत इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकार्यांनी गुरुवारी (24) धाड टाकली. सुमारे 100 अधिकारी, कर्मचारी हे सुरक्षा यंत्रणांसह सकाळी 11 वाजल्यापासून गेट बंद करून कागदपत्रे व कंपनीच्या आर्थिक उलाढालीची तपासणी करीत होते. जीडीएल कंपनीतून कंटेनर मालाची मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात केली जाते. या कंपनीत इन्कम टॅक्स विभाग काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper