मुरूड ः प्रतिनिधी
जंजिरा किल्ल्यावर करडी नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खोल अरबी समुद्रात ऐतिहासिक पद्मदुर्ग बांधला होता. या किल्ल्यावर मुरूड पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीच्या मावळ्यांनी गुरुवारी (दि. 29) स्वच्छता मोहीम राबविली. किल्ल्यातील गवत कापणे, गोड्या पाण्याचे तलाव स्वच्छ करणे, तोफांची स्वछता करून योग्य जागी बसवणे, कोटेश्वरी देवीचे मूळ स्थान आहे, त्याची स्वच्छता करून पूजन करण्याचे काम या मावळ्यांनी केले. ही स्वच्छता मोहीम पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीचे अध्यक्ष आशीलकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्वच्छता मोहिमेत राहुल कासार, रुपेश जामकर, गणेश सतविडकर, संकेत आरकशी, मंगेश रणदिवे, सतेज विरुकुड, विरेंद्र गायकर, विजय वाणी, अच्युत चव्हाण, प्रदिप बागडे, संदिप घरत, सुनील शेळके, रुपेश दांडेकर, संकेत आरकशी व ग्रुप खारअंबोली आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते. पद्मदुर्गाची अवस्था एवढी बिकट झाली असून लवकरच किल्ल्याची डागडुजी करणे आवश्यक आहे, नाहीतर हा नावापुरता राहून इतिहासजमा होईल. पद्मदुर्गाचे संवर्धन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य स्मारक व जेटी उभी करावी, अशी मागणी पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती अध्यक्ष आशिलकुमार ठाकूर यांनी केले.