आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
नवी मुंबई : बातमीदार
बेलापूर येथे भवानी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी डॉ. सदानंद शेट्टी यांनी आंतरिक समाधान हे समाजासाठी काही तरी काम केले तरच मिळते. निरोगी शरीरा सोबतच निरोगी मन हवे असेल तर समाजासाठी काही तरी विधायक काम सर्वांनी केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
यासोबतच भवानी फाऊंडेशन जे सामाजिक कार्य करते त्यासाठी आपण सर्वांनी या कार्याला सामाजिक बांधीलकीतुन हातभार लावला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन भवानी फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबिरात भवानी शिपिंगचे सर्व कर्मचारीसह संचालक कुसुमोदर शेट्टी, दिनेश शेट्टी, दीक्षित शेट्टी, शिखा शेट्टी सहभागी झाले होते. महात्मा गांधी हॉस्पिटल कामोठेच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे हे आठवे वर्ष होते. या वेळी झालेल्या रक्त संकलनांने ड्रॉक्टरांनी समाधान व्यक्त केले. एकूण 167 युनिट रक्त संकलन झाले. हे रक्त गरीब रुग्णांसाठी उपयोगात येणार असल्याची माहिती दीक्षित शेट्टी यांनी दिली. भवानी फाऊंडेशनचे संस्थापक कुसुमोदर शेट्टी यांनी फाऊंडेशन करत असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहीती दिली. कार्यक्रमास नवी मुंबई भाजयुमोचे अध्यक्ष सुनील सुतार यांनी आपले मनोगत वक्त केले. नवी मुंबई भूषण पुरस्कारासाठी आपण कुसुमोदर शेट्टी याची शिफारस करणार असल्याचे सांगितले. पनवेल महापालिका माजी सभापती संतोष शेट्टी यांनी भवानी फाऊंडेशनचे काम नवीन पिढीला प्रेरणा देणारे आहे व हा वारसा पुढे जपला जाणार यांची खात्री आहे, असा विश्वास वक्त केला सरिता शेट्टी, नवीन शेट्टी, मुरलीधर पालवे, पंडित नवीचंद्र सनील, मोहन राय कारनुर, रोहन बाचेवर, दिनेश शेट्टी, भवानी फाऊंडेशनचे सभासदांसह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper