Breaking News

माथेरान प्रश्न मार्गी लावू; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

कर्जत : प्रतिनिधी
माथेरान हे महाराष्ट्राचे नंदनवन असून तेथील वन विभागांतर्गत असलेले विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. माथेरानमधील सर्व समस्या लवकरच मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.
माथेरान शहरातील वनविभाग अंतर्गत विविध प्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात भाजपचे माथेरान शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, सरचिटणीस राजेश चौधरी, माजी नगरसेवक प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव, राकेश चौधरी, संदीप कदम, दीपक शहा, संतोष कदम, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे, अभियंता स्वागत बिरंबोळे यांचा समावेश होता. या वेळी अनेक मुद्द्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.
माथेरानमधील उर्वरित प्रेक्षणीय स्थळे सुशोभीकरण, कार पार्किंगच्या व्यवस्थेमध्ये सुसूत्रता यावी, होणार्‍या जमिनीची धूप थांबविण्याकरिता योग्य त्या उपाययोजना कराव्यात, वन-उद्याने विकसित करण्यासाठी निधी मिळावा, नागरिकांच्या दळणवळणासाठी माथेरान-धोदानी-पनवेल पर्यायी मार्ग सुरू व्हावा, माथेरानमधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना साहसी क्रीडा प्रकार व्हॅली क्रॉसिंग जीप लाईन पुन्हा सुरू करण्यात यावी, सनियंत्रण समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्याधिकारी, आमदार यांचा समावेश करण्यात यावा व प्रेक्षणीय स्थळांवर उपजीविका करणार्‍या स्थनिक तरुणांना 11 महिन्यांच्या भाडेतत्त्वावर जागेचा करारनामा करण्यात यावा, वने-उद्याने विकसित करण्यासाठी निधी मिळावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यांच्या कार्यवाहीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकारीवर्गाला निर्देश दिले.
दरम्यान, या वेळी भाजप कर्जत तालुका मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर, माजी पंचायत समिती सदस्य नरेश मसणे, युवा कार्यकर्ते किरण ठाकरे, नेरळ माथेरान टॅक्सी युनियनचे अध्यक्ष नरेंद्र कराळे यांच्या वतीने विभागातील विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply