पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील करंजाडे येथे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत यु. के. ग्रुपच्या वतीने सरपंच, उपसरपंच चषक 2023 या भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी
(दि. 13) झाले.
स्पर्धा 13 ते 16 फेबु्रवारीदरम्यान करंजाडे सेक्टर 6 येथील दि. बा. पाटील मैदानात खेळली जात आहे. प्रथम क्रमांक विजेत्यास एक लाख रुपये, द्वितीय विजेत्यास 50 हजार आणि तृतीय विजेत्यास 25 रुपये आणि तिन्ही विजत्यांना भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper