नवी मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचा (रासप) कोकण विभागीय कार्यकर्ता मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेल येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी कोकण प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण लढवणार असून कार्यकर्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार महादेव जानकर यांनी केले. भव्य मेळाव्याचे आयोजन रासपचे कोकण विभागीय अध्यक्ष भगवान ढेबे, रायगड महिला आघाडी अध्यक्षा मनीषा ठाकूर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत संतोष ढवळे, अक्षय मिसाळ यांनी केले होते. या मेळाव्यात आमदार महादेव जानकर यांनी कोकणातील कार्यकर्त्यांशी मेळाव्यात संवाद साधला. रासपची घौडदौड राज्यात चालू असू असून कोकणात पक्ष संघटना अधिक मजबूत करू असे रासप कोकण विभागीय अध्यक्ष भगवान ढेबे यांनी सांगितले तर रायगड जिल्ह्यातील विविध प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कष्टकरी, घरेलू कामगार, श्रमिक याना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विधायक उपक्रम राबवू असे रायगड जिल्हा महिला अध्यक्षा मनीषा ठाकूर यांनी सांगितले. या वेळी रासप नेते एस. एल. अक्कीसगर, कुमार सुशील, बाळकृष्ण लेंगरे, काशीनाथ शेवते व ज्ञानेश्वर माऊली सलगर यांनी कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केले. या मेळाव्याला पालघर ठाणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने पनवेल येथील फडके नाट्यगृहात उपस्थिती दर्शवली होती.