Breaking News

पनवेलमधील राजभाषा महोत्सवाला परेश ठाकूर यांची सदिच्छा भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पनवेल शहरात राजभाषा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 22 ते 27 फेब्रुवारी या दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये मराठी पुस्तकांसाठी विरुपाक्ष सभागृहशेजारील मैदानात ‘लोकनेते दि. बा. पाटील पुस्तकनगरी’ हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या पुस्तक प्रदर्शनास महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी (दि. 26) भेट दिली. या महोत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. पनवेल मनसेतर्फे शाल व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, मनसे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले, जिल्हा सचिव अतुल चव्हाण, उपशहर प्रमुख संजय मुरकुटे, वाहतूक सेनेचे सचिन जाधव, रस्ते आस्थापना जिल्हा सरचिटणीस किरण गुरव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply