लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
मोहोपाडा ः प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष उरण विधानसभा आयोजित एमजीएम हॉस्पिटल कामोठे व कळंबोली, लक्ष्मी आय इन्स्टिट्युट पनवेल, प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोपाडा येथील जनता विद्यालय येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 4) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी शिबिराची पाहणी केली. व्यासपीठावर वासांबे-मोहोपाडा भाजपच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला.
आरोग्य शिबिरात शल्यचिकित्सा, अस्थिरोग सामान्य तपासणी, कान, नाक, घसा, नेत्ररोग, दंतचिकित्सा त्वचारोग, रक्त तपासणी, इसीजी, औषधोपचार करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना मार्गदर्शनही केले, तर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणार्या रुग्णांवर एमजीएम हॉस्पिटलमध्ये ती केली जाणार आहे. या शिबिराचा सातशे ते आठशे नागरिकांनी लाभ घेतला. अनेकांना मोफत चष्मे देण्यात आले. याबद्दल सर्वांनी आयोजकांचे आभार मानले. या ठिकाणी रक्तदान शिबिरही झाले.
आरोग्य शिबिरास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीरशेठ ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी सभापती खेड, तालुकाध्यक्ष रामदास पाटील, सरचिटणीस प्रमोद जांभळे, वासांबे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल, पंचायत समिती अध्यक्ष आकाश जुईकर, माजी सरपंच लक्ष्मण पारंगे, शहर अध्यक्ष चेतन जाधव, अमित शहा, नारायण तांडेल, सचिन कुरंगळे, प्रशांत तांबोळी, भरत मांडे, विशाल मुंढे, मनोज सोमाणी, अनिल गीध, जयदत्त भोईर, युवा मोर्चा अध्यक्ष नरेश गोपाळे, नरेंद्र गोपाळे, संजय पाटील, प्रमोद खारकर आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.