Breaking News

आदिवासी लीगमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा -आमदार महेश बालदी

चौक : प्रतिनिधी
आदिवासी रायगड प्रीमियर लीगमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा. त्यासाठी लागणारी मदत आपण करू, असे प्रतिपादन उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी केले. चला खेळूया एकतेसाठी या शीर्षकाखाली आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे दुसरे पर्व उत्साहात झाले. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी बोलत होते. माडपाई इलेव्हन माडप संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष विष्णू खैर, उपाध्यक्ष शरद वाघे, सचिव महादेव पिरकड, खजिनदार प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या क्रिकेट स्पर्धेत संपूर्ण रायगड जिल्ह्यातील 36 आदिवासी संघांनी भाग घेतला होता. कांढरोली येथील मैदानावर झालेल्या या स्पर्धेस आमदार महेश बालदी यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले आणि खेळाडूंना प्रोत्साहित केले. त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी सभापती जयवंती हिंदोळा, प्रफुल्ल विचारे, भाजप खालापूर तालुका मंडल अध्यक्ष प्रवीण मोरे, विधानसभा प्रमुख प्रसाद थोरवे, नेरळ सरपंच उषा पारधी, ठाकूर समाज महिला अध्यक्ष सीमा मेंगाळ, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण समिती सभापती दामू खैर, उद्योजक रामदास काईनकर, नारायण ठाकूर यांची उपस्थिती होती. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत श्लोक स्पोर्ट्स इलेव्हन गराडा द्वितीय क्रमांक, सान्वी तनिष्का इलेव्हन मोहपाडा तृतीय, मयूर इलेव्हन संजयनगर चतुर्थ आणि पाचवा क्रमांक मनवा इलेव्हन रानसई संघाने मिळवला. मालिकावीर प्रशांत पवार, उत्कृष्ट फलंदाज अजय भस्मा (गराडा), उत्कृष्ट गोलंदाज राजेश कातकरी (माडप) आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून शैलेश कातकरी (माडप) या खेळाडूंची निवड करण्यात आली. विजेते संघ आणि वैयक्तिक चमकदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
चार दिवस रंगलेल्या या स्पर्धेसाठी डी.एन. पवार, शरद ठोंबरे, दामू कातकरी, अशोक पवार, रमेश निरगुडा, जयेश पारधी यांच्यासह आदिवासी खेळाडू, क्रिकेटप्रेमी यांनी मेहनत घेतली.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply