मुरुड : प्रतिनिधी : मुरुड ते साळाव रस्त्याच्या कामास मंगळवार (दि. 21) पासून सुरुवात झाली आहे. सुमारे 7 कोटी रुपयांच्या या कामाची सुरुवात कोटेश्वरी मंदिरापासून करण्यात आली. सध्या असलेल्या रस्त्यावर कार्पेट टाकण्याचे काम सुरु आहे. कोटेश्वरी मंदिरापासून नवाबाच्या राजवाड्याच्या पुढे सदरचे काम करण्यात येणार आहे. पावसाळा जवळ आला असून, तत्पुर्वी रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी केली आहे. या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper