


कडाव : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत मिळविलेले नेत्रदीपक यश आणि मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाने हरखून गेलेल्या कर्जत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 23) शहरात नागरिकांना पेढे भरविले. तसेच फटाक्यांची आतषबाजी व ढोलताषांच्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला.
मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे वृत्त येताच कर्जतमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्याचवेळी देशात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएची विजयी घोडदौड सुरु होती. त्यामुळे आनंदीत झालेल्या कर्जत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी शहरातील लो. टिळक चौकातून महावीर पेठमार्गे संपूर्ण बाजार पेठेत विजयी रॅली काढली होती. या आनंदोत्सवात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक भोईर, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका स्वामिनी मांजरे, भाजप किसान मोर्चाचे सुनिल गोगटे, प्रदेश उपाध्यक्षा कल्पना दास्ताने, कर्जत विधानसभा सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष विलास श्रीखंडे, कार्यालयीन चिटणीस परशुराम म्हसे, चिटणीस पंकज पाटील, संतोष ऐनकर, राहुल कुलकर्णी, राजेंद्र जाधव, हरेश ठाकरे आदी पदाधिकार्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खोपोलीत भाजपतर्फे पेढे वाटप

खोपोली : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीने दैदिप्यमान यश प्राप्त केले. या पार्श्वभूमीवर खोपोली व परिसरात भाजपने आनंदोत्सव साजरा केला. शहरातील दीपक हॉटेल चौकात तसेच समाज मंदिर परिसरातील डॉ. बाबासाहेब आबेडकर पुतळ्यासमोरील प्रांगणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
प्रारंभी डॉ. आबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी आमदार देवेंद्र साटम आणि भाजप शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानतंर कार्यकर्त्यानी एकमेकांना पेढे भरवून मोदीच्या व भाजप महायुतीच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी पाटील, इंदरमल खंडेलवाल, खोपोली नगर परिषदेतील गटनेते तुकाराम साबळे, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, शिवसेना शहर प्रमुख सुनील पाटील, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, नगरसेविका अपर्णा मोरे, शिवसहकार सेनेचे हरीश काळे, शहर युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा रसिका शेट्ये, अजया जाखोटीया, युवा नेते सचिन मोरे, माजी नगरसेविका अनिता शाह, माजी नगराध्यक्ष सोहनराज राठोड, रामदास ठोंबरे, राहुल गायकवाड, पुनित तन्ना, स्वाती बिवरे, स्नेहल सावंत, सुमती महर्षी, संभाजी नाईक, दिलीप निंबाळकर यांच्यासह शहर युवा व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवेंद्र साटम यांनी जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील यांना पेढा भरविल्यानंतर सर्व उपस्थितांना पेढे वाटण्यात आले. एनडीएच्या विजयाबद्दल खोपोली शहराच्या विविध भागात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. खालापूर येथे भाजप तालुकाध्यक्ष बापू घारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. या वेळी पेढे वाटण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper