पेण रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण

पेण  : प्रतिनिधी

कोकणातील रेल्वेस्थानकांत इकोफ्रेंडली सुशोभीकरणावर भर देण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. त्याअनुशंगाने पर्यावरणाशी समतोल राखणारे निसर्ग सौदर्य त्याचबरोबर इकोफ्रेंडली तंत्रज्ञानाचा वापर करून पेण रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.

पेण हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती रेल्वे स्थानक म्हणून उभे राहिले आहे. सध्या या मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे.  पेण ते पनवेल या दुहेरी मार्गाची लांबी 35.46 किमी आहे तर पेण-रोहा दुहेरी मार्ग 40 किमी लांब आहे. या मार्गावर पेण ते पनवेल असा दुहेरी मार्ग पुर्णपणे तयार झाला असून पेण-रोहा मार्गावरील पेण ते नागोठणे दुहेरी मार्गाचे काम पूर्ण झाले असून, नागोठणे ते रोहा दुहेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रेल्वे मार्गावर तासी 105 किमी प्रती वेगाने रेल्वे गाड्या धावत आहेत. या मार्गावरील पुलांची क्षमता 25 मेट्रिक टन एवढी आहे. पेण-पनवेल मार्गाचा प्रस्तावित खर्च 260.96 कोटी झालेला आहे. तर पेण-रोहा रेल्वे मार्गाचा खर्च 300 कोटी पर्यंत आहे. सन 2006 साली या कामांना सुरूवात झाली होती. मार्च 2015 मध्ये हे काम बहुतांशी पूर्ण झालेले आहे. यामुळे आता या मार्गावरील पेण रेल्वे स्थानकाला भविष्यात गर्दीचे मोठे स्वरूप

येणार आहे.

पेण स्थानकात पर्यावरणपुरक सुविधामध्ये सौऊर्जा पॅनल व पवनचक्की याद्वारे विजनिर्माण करून त्यावर एलईडी लाईटस, पंखे, वॉटर कुलर, युटीएस, ग्लोसींग बोर्डस, पोल लाईटस चालविण्यात येतात. अशा प्रकारे अपारंपारिक ऊर्जेचा वापर करून पेण रेल्वे स्थानकाला झळाली देण्यात आहे. ही सर्व यंत्रणा सध्या स्थानकामध्ये उपलब्ध असून स्थानकाचे देखणेरूप भविष्यात अधिक कलात्मक करण्याकडे रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.

येत्या काळात पेण रेल्वे स्थानकाच्या सौदर्यांत मोठी भर पडणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. प्रवाशांना लागणार्‍या सर्व सुविधा या स्थानकामध्ये उपलब्ध असून, फक्त पार्किंग व्यवस्थेमध्ये जागेची कमतरता भासत आहे. सध्या उपलब्ध असणारे वाहनतळ मोटारसायकल पुरतेच सिमीत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन या समस्या दूर करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशातर्फे करण्यात येत आहे.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply