पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक मार्गदर्शन सत्र रविवारी (दि. 9) सकाळी 10 वाजता संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
महाविद्यालयात प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर व रोजगारविषयक वेगवेगळे उपक्रम राबविले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून हे करिअरविषयक मार्गदर्शन सत्र होणार आहे. या वेळी इयत्ता बारावी आणि पदवीनंतरच्या करिअरच्या संधी या विषयावर चाणक्य मंडल परिवार पुणेचे विश्वस्त आणि न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन्सचे संचालक डॉ. भूषण केळकर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी संवाद साधणार आहेत.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के. पाटील आणि प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष प्रा. एस.एस. कांबळे यांनी पनवेल व सभोवतालच्या परिसरातील महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांना निमंत्रित केले आहे तसेच विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन सत्रात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper