आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील नितळस येथे आई गावदेवी यात्रेनिमित्त ग्रामस्थ मंडळ चषक या भव्य कुस्त्यांच्या जंगी सामन्यांचे आयोजन लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुलात शुक्रवारी (दि. 18) करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट देत कुस्तीपटूंना प्रोत्साहन दिले.
कुस्ती हा केवळ एक खेळ नाही, तर ती आपल्या मातीतील परंपरा आणि संस्कृती आहे. अशा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते, असे सांगत आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामस्थ मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि दरवर्षी अशा स्पर्धांचे आयोजन करण्याचे आवाहन केले.
पनवेल महानगरपालिका हद्दीत उभारल्या जाणार्या क्रीडा संकुलाविषयी माहिती देताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या या संकुलात खेळाडूंना नियमित सराव करण्याची आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल. या संकुलात कुस्तीपटूंनाही उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळेल.
या स्पर्धेवेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, नितळसचे सरपंच संदीप पाटील, राजा भोईर, रूपेश पावशे, बाळाराम घाटे, परशुराम गोंधळी, धर्मा डोंगरी, मारूती पावशे, कैलास पावशे, सुरेश शिंदे, सोपान साठे, गुरूनाथ पावशे, साजन पावशे, विकास पावशे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व कुस्तीपटू उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper