Breaking News

कळंबोलीत आरोग्य शिबिर, विद्यार्थी गुणगौरव

मान्यवरांकडून अमर पाटील यांचे अभीष्टचिंतन

कळंबोली ः रामप्रहर वृत्त
भाजपचे कळंबोली मंडळ अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 16) विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला. वाढदिवसानिमित्त कळंबोलीमध्ये तीन ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सुएसोच्या कळंबोली येथील शाळा सभागृहात झालेल्या विद्यार्थी गुणगौरव आणि अभीष्टचिंतन कार्यक्रमात बोलताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, तरुण, तडफदार नेतृत्व असलेले अमर पाटील यांनी मिळालेली प्रत्येक संधी सिद्ध करून दाखवली, असे गौरवोद्गार काढले; तर आमदार प्रशांत ठाकूर यांनीही अमर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कळंबोलीवासीयांच्या विकासाची संकल्पना प्रत्यक्षात यावी या दृष्टिकोनातून भाजप कार्यरत आहे, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठनेते वाय.टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, गणेश कडू, प्रमिला पाटील, मोनिका महानवर, कामोठे मंडळ शहराध्यक्ष विकास घरत, माजी अध्यक्ष रवींद्र जोशी, पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, कळंबोली मंडळ माजी अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, रमेश मुंडे, धनश्याम शर्मा, गौरव नाईक, कृष्णा गर्जे, सरचिटणीस दिलीप बिष्ट, सुनील ठोंबरे, अमर ठाकूर, केशव यादव, विनोद बोरसे, विष्णू गायकवाड, निलेश भोईर, माजी जि.प. सभापती प्रिया मुकादम, सरस्वती काथारा, शुभांगी निर्मले, सुनिता हिरवळे, पालवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सर्वांनी अमर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशंभो सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल तालुका महसूल विभागामार्फत काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या दाखले शिबिरातील लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply