पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विश्वगुरू बनवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आत्तापासून ते 2047 पर्यंतचा काळ हा अमृत काळ आहे. या अमृत काळात आपल्याला प्रत्येक पाऊल गतीने टाकत 2047पर्यंत आपला देश विश्वगुरू बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते माधव गांगुर्डे यांनी संकल्प सभेत केले.
भारतीय जनता पक्ष, पनवेल शहर मंडळातर्फे विकसित भारत संकल्प सभा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजीत करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 11 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानिमित्त देशाच्या विकासासाठी घेतलेल्या संकल्पांना जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आखलेल्या धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या मंत्रावर आधारित कामकाजाची माहिती देण्यात आली.
या सभेला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, गणेश कडू, मुकित काझी, राजू सोनी, अजय बहिरा, सुनील बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, सारिका भगत, प्रीती जॉर्ज, निता माळी, भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस अमित ओझे, रूपेश नागवेकर, उपाध्यक्ष केदार भगत, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा रुचिता लोंढे, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संजय जैन, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिटणीस अमरीश मोकल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper