लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांच्यास्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिर


पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि पनवेल उरण आगरी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील ज्योतिबा महात्मा फुले सभागृहात मंगळवारी (दि. 24) मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, दंत चिकित्सा, ईसीजी, मधुमेह, रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. शिबिराच्या उद्घाटनावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, कृती समितीचे खजिनदार जे. डी. तांडेल, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, सारिका भगत, भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, लायन ग्रुपचे अध्यक्ष बाळू फडके, उपाध्यक्ष रवींद्र शेळके, महिला अध्यक्ष माजी नगरसेविका नीता माळी, विजय गायकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी ‘दिबा’साहेबांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या शिबिरात 492 नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच 294 गरीब, गरजू नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये 275 नागरिकांना चष्मा वाटप करण्यात आले.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply