लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील विद्यार्थिनी नव्या सचिन मांडोळे हिला अखिल भारतीय प्रतिभा सन्मान महासंमेलनात रेडियंट टॅलेंट बुकच्या वतीने शाल, ट्रॉफी व प्राइड ऑफ भारत अवॉर्ड 2025 गौरवपत्र देऊन राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात आयोजित या समारंभास देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या वेळी नव्या हिने अप्रतिम नृत्य सादर करून आपली अदम्य क्षमता, कला सादर केली.
दरम्यान, राष्ट्रीय स्तरावरील नृत्य क्षेत्रातील पुरस्काराने सीकेटी विद्यालयाच्या नावलौकित भर घालणार्या नव्याचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विशेष कौतुक करत शाब्बासकीची थाप दिली. या वेळी संस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाचे सदस्य संजय भगत, इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीलिमा शिंदे आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper