Breaking News

हक्क आणि कर्तव्य एका नाण्याच्या दोन बाजू -लोकनेते रामशेठ ठाकूर

महारोजगार मेळाव्यात 5781 उमेदवारांचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्तव्य आणि हक्क या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात चांगली कामगिरी करून पुढे जावे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 2) खांदा कॉलनी येथे महारोजगार मेळाव्यात केले. दरम्यान, या मेळाव्यात 5781 उमेदवारांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेल, चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय अंतर्गत प्लेसमेंट सेल आणि इंटरनल क्वालिटी अशुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात महारोजगार मेळावा 2025चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या मेळाव्याला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक (जेबीएसपी) संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, लोकनेते दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, ‘जेबीएसपी’चे सचिव डॉ. एस.टी. गडदे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस चारुशीला घरत, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, अ‍ॅड. मनोज भुजबळ, एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, गणेश कडू, रवींद्र भगत, तेजस कांडपिळे, अजय बहिरा, गणेश पाटील, सुनील बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, अनुराधा ठोकळ, सारिका भगत, प्रीती जॉर्ज, सुशीला घरत, सुरेखा मोहोकर, राजेश्री वावेकर, रूचिता लोंढे, वृषाली वाघमारे, वर्षा नाईक, माजी जि.प. सदस्य राजेंद्र पाटील, जीवन म्हात्रे, माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत, पनवेल तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, आदेश ठाकूर, अमरीश मोकल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले की, पनवेल विभाग सर्व दृष्टिकोनातून प्रगत होत आहे. येथे उद्योग-व्यवसाय येत असताना बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली पाहिजे यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संधी येतात, त्या घेणे महत्त्वाचे आहे. घरी बसून काम मिळत नाही. मेहनतीची तयार असली पाहिजे. एखादा उमेदवार नवीन असेल, तर डावलू नका. त्याला प्रशिक्षण देऊन सेवेत घ्या, असा मार्गदर्शक सल्ला त्यांनी कंपन्यांना दिले तसेच नोकरीत समाविष्ट झाल्यानंतर कंपनीची प्रगती कशी होईल याकडे कामगारांनी लक्ष दिले पाहिजे. त्या अनुषंगाने उमेदवार आणि संबंधित कंपन्यांचा समन्वयही तितकाच महत्त्वाचे आहे, असेही नमूद केले आणि या मेळाव्याच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, 2014 सालापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध धोरणे अमलात आणली. त्यामुळे रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जाणार असून हे विमानतळ ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. या विमानतळाची प्रतीक्षा गेल्या पंधरा वर्षांपासून होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला वेग आला. या विमानतळामुळे देशाची अर्थव्यवस्था एक टक्क्याने वाढणार आहे आणि या अनुषंगाने त्याचा चांगला परिणाम देशाच्या विकासासाठी होणार आहे.प्रकल्पांच्या माध्यमातून परिसराचा विकास होणार असून रोजगाराच्या मोठी संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अशा मेळाव्यांचे आयोजन त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे.
सुरुवातीला या महारोजगार मेळाव्यात 40 कंपन्यांचा सहभाग होता, पण आता 81 कंपन्या जोडल्या गेल्या आहेत आणि त्या माध्यमातून चार हजार नोकर्‍यांची संधी उपलब्ध झाली आहे, असे सांगून या मेळाव्याच्या नियोजनबद्ध आणि यशस्वी आयोजनाबद्दल अ‍ॅड. चेतन जाधव व त्यांच्या सहकार्‍यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले. प्रास्ताविकात सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के.पाटील यांनी मेळाव्यासंदर्भातील माहिती दिली.
पात्र उमेदवारांना ऑन द स्पॉट अपॉईंटमेंट लेटर
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने राबवले जात आहेत. त्याच अनुषंगाने यंदाही महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या महारोजगार मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे होते. त्यानुसार विविध क्षेत्रातील नामांकित व प्रतिष्ठित अशा जवळपास 81 कंपन्या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना या माध्यमातून प्रत्यक्ष नोकरीसाठी निवड होण्याची सुवर्णसंधी मिळाली. मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवीप्राप्त तसेच अकुशल अशा एकूण 5781 उमेदवारांनी लाभ घेत मेळावा यशस्वी केला. या वेळी काही पात्र उमेदवारांना ऑन द स्पॉट अपॉईंटमेंट लेटर देण्यात आले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply