लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल आणि उरण मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. भाजप गव्हाण जिल्हा परिषद, वहाळ आणि गव्हाण पंचायत समिती विभागाच्या वतीने रविवारी (दि. 10) गव्हाण ग्रामपंचायत हॉलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या आरोग्य शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, माजी पं.स. सदस्य भाऊशेठ पाटील, रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजप पश्चिम मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, उलवे नोड 1 अध्यक्ष निलेश खारकर, उलवे नोड 2चे अध्यक्ष विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमर म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जिज्ञासा कोळी, माजी उपसरपंच सचिन घरत, माजी ग्रामपंचायत सदस्य हेमंत पाटील, मीनाक्षी पाटील, कामिनी कोळी, शैलेश भगत, महिला मोर्चाच्या विभागीय अध्यक्ष निकिता खारकर, युवा मोर्चा पश्चिम मंडळ अध्यक्ष धीरज ओळेकर, गव्हाण जि.प. अध्यक्ष वितेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. या शिबिरात नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.
RamPrahar – The Panvel Daily Paper