पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका सुरू असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आणि पक्षाच्या नियमानुसार जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी उत्तर रायगड जिल्हा पदाधिकार्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये चार सरचिटणीस (महामंत्री), आठ उपाध्यक्ष, आठ चिटणीस, एक कोषाध्यक्ष व इतर कार्यकारी सदस्य अशा एकूण 90 जणांचा समावेश आहे. यामध्ये 33 टक्के महिला पदाधिकारी, एससी, एसटी पदाधिकार्यांना पक्षाच्या घटनेप्रमाणे पुरेसे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
या कार्यकारिणीत सरचिटणीस म्हणून दीपक बेहेरे, माजी नगरसेवक नितीन पाटील, अॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपाध्यक्ष म्हणून सुधीर ठोंबरे, अश्विनी पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, प्रल्हाद केणी, चंद्रकांत घरत, गणेश कडू, मयुरेश नेतकर व समीर कदम यांना संधी देण्यात आली आहे. चिटणीस म्हणून नितीन कांदळगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, रविनाथ पाटील, शरद ठाकूर, विद्या तामखडे, विनिता घुमरे, सायली म्हात्रे, शामला सुरेश यांना जबाबदारी देण्यात आली असून कोषाध्यक्षपदी अभिलाषा ठाकूर यांना कायम ठेवण्यात आले आहे. यासह नगरसेवक व लोकप्रतिनिधींना कार्यकारिणी सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.
उत्तर रायगड जिल्ह्यात भाजपची 17 मंडळे तीन विधानसभा आणि चार तालुक्यांमध्ये विभाजित झाली आहेत. पक्षाच्या सूचनेप्रमाणे सर्व मंडळे, सर्व विधानसभा व सर्व समाज घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. या नियुक्तीनंतर लवकरच विविध आघाड्या, सेल, व प्रदेश सदस्य जाहीर करण्यात येणार आहेत.
नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार सुरेश लाड, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, रविशेठ भोईर, महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper