Breaking News

पनवेलमध्ये सोसायटी मित्र मंडळाचा दहीहंडी उत्सव जल्लोषात

पनवेल : रामप्रहर वृत्त
गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा अशा जयघोषात सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा झाला. या उत्सवात मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील रहिवाशी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अनिवाश कोळी आणि माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी या उत्सवात सहभागी होऊन दहीहंडी फोडलेल्या मंडळांना तसेच लहान मुलांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना प्रोत्साहित केले. दहीहंडीदरम्यान वरुणराजाचे हजेरी लावल्यामुळे गोविंदांचा आनंद द्विगुणीत झाल्याचे दिसून आले.
सोसायटी मित्र मंडळाची हंडी फोडण्याचा मान कोळीवाडा येथील गोविंदा पथकाला मिळाला. त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या वेळी प्रमुख मान्यवरांसह उद्योजक राजू गुप्ते, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज, उल्हास झुंझारराव, भाजप पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, सुदर्शन पॉल, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, गिरीश जगे, प्रवीण मोरबाळे, अमेय देशमुख, आदित्य देशमुख, संतोष कुवर, संदीप पाटील, स्वरूप वाणी, जयदीप पाटील, राजू पुरोहित, प्रद्युम्न कुठले, अपूर्व ठाकूर यांच्यासह मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply