Breaking News

रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा उत्साहात

पुरुष गटात श्री सोमजाईदेवी मंडळ, तर महिलांमध्ये शिरसाई मंडळ ठरले मानकरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
गोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या पुरुष गटात म्हसळ्याच्या श्री सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळाने, तर महिला गटात कर्जतच्या शिरसाई प्रासादिक महिला भजन मंडळाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख मान्यवर म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक जयंत पगडे, भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
पुरुष गटात द्वितीय क्रमांक सुरताल भजन मंडळ नारंगी, तृतीय क्रमांक श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ खारघरने, तर उत्तेजनार्थ पारितोषिक अलिबागच्या स्वरविहार भजन मंडळाने पटकावले. यामध्ये उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे कुणाल पाटील आणि उत्कृष्ट तबला वादक भूषण गायकर ठरले.
महिला गटात द्वितीय क्रमांक आई एकविरा महिला भजन मंडळ दुंदरेपाडा, तृतीय क्रमांक श्री. सद्गुरूकृपा प्रासादिक महिला भजन मंडळ चिंचवली आणि उत्तेजनार्थ पारितोषिक श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ नेरळ यांनी पटकाविले. उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून कै. वैयजंती माता भजन मंडळ रसायनीचे ओमकार तराळे, तर आई एकविरा भजन मंडळाचे रोहन पाटील उत्कृष्ट तबला वादकचे मानकरी ठरले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात स्पर्धा रंगली. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या विजेत्या मंडळाला प्रत्येकी 51 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला 25 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 15 हजार रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक सात हजार रुपये, तसेच उत्कृष्ट पखवाज वादक व उत्कृष्ट तबला वादक यांना प्रत्येकी सात हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून पं. शंकरराव वैरागकर, बंडाराज घाडगे, नंदकुमार पाटील यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी पुरुष गटातून 36, तर महिला गटातून 30 भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यामधून पुरुष गटातील अंतिम फेरीसाठी श्री सद्गुरू वामनबाबा प्रासादिक भजन मंडळ सिद्धी करवले, श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ खारघर, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ वलप, श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ गव्हाण, सुरताल भजन मंडळ नारंगी, जय श्री राधे गोविंद भक्ती समूह कामोठे, शारदा संगीत भजन मंडळ विचुंबे, स्वरविहार भजन मंडळ अलिबाग, श्री स्वामी समर्थ भजन मंडळ अंजप, श्री सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळ म्हसळा, श्रीराम वरदायिनी भजनी मंडळ उलवे, श्री सिद्धेश्वर प्रासादिक संगीत भजन मंडळ आवास, श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ वावंजे, गावदेवी प्रासादिक भजन मंडळ पेंधर, श्री गंगादेवी भजन मंडळ अलिबाग; तर महिला गटात श्री पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ खारघर गाव, आई एकविरा महिला भजन मंडळ दुंदरेपाडा, कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ ओवेपेठ, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ वाजे, श्री सद्गुरू कृपा प्रासादिक महिला भजन मंडळ चिंचवली, कै. वैजयंती माता भजन मंडळ सावळे, सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळोजे मजकूर, श्री विश्वविजयनाथ सुहास्य संगीत विद्यालय उरण, ओमसाई भजन मंडळ खरसुंडी, नवदुर्गा प्रासादिक भजन मंडळ कोपरा, शिरसाई प्रासादिक महिला भजन मंडळ कर्जत, श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ नेरळ, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ खोपोली, राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ वावंजे, आणि ओंकार संगीत भजन मंडळ नेरळ या मंडळांची निवड झाली होती.
दोन दिवस चाललेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत मंडळांनी आपली कला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेच्या आयोजनामुळे भजन मंडळे व कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply