Breaking News

विंडीज क्रिकेटपटू ओशानेच्या समोर घातली भावाला गोळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आयुष्यात नमके काय, कधी, कसं घडेल हे सांगता येत नाही. काही वेळा एवढे भयंकर प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडतात की तुम्हाला काहीच करता येत नाही. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू डोळ्यासमोर पाहता. अशीच एक गोष्ट त्याच्याबाबतीतही घडली. बर्‍याच खडतर गोष्टींचा सामना करून हा वेस्ट इंडिजचा खेळाडू आता इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे तो विश्वचषक खेळण्यासाठी. ही गोष्ट आहे वेगवान गोलंदाज ओशाने थॉमसची.

वेस्ट इंडिजमधील काही ठिकाणी राजरोसपणे गुन्हे घडत असल्याचे पाहायला मिळते. हा थॉमस जेव्हा 11 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या डोळ्यादेखत मोठ्या भावला गोळी घातली गेली होती. ओशाने आणि त्याच्या भावाचे खास नाते होते. ते दोघे कुठेही एकत्रच जायचे. त्यामुळे जेव्हा आपल्या मोठ्या भावाला गोळी लागली तेव्हा नेमके काय करायचे हे ओशानेला समजले नाही. या प्रकरणात ओशानेच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला. ओशाने जेव्हा 20 वर्षांचा झाला तेव्हा तो जमैकाची राजधानी किंग्स्टन येथे गेला. किंग्स्टनध्येही ओशानेला वाईट अनुभव आहे. ओशाने मार्केटमध्ये जाण्यासाठी घरून निघाला. रस्त्यात एका एटीएमजवळ उभ्या असलेल्या तीन जणांनी ओशानेला लुटले. या वेळी चोरांनी ओशानेकडील पैसे, सोन्याची चेन आणि घड्याळ या गोष्टी लंपास केल्या. या सर्व गोष्टींनंतरही ओशानेने हार मानली नाही. त्याने प्रामाणिकपणे मेहनत करत वेस्ट इंडिजच्या संघात स्थान पटकावले आणि आता गुणवत्तेच्या जोरावर विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवले आहे.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply