Breaking News

रोडपालीत शेकापला जोरदार झटका

अनेक कार्यकर्त्यांचा समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोडपालीत शेतकरी कामगार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शेकापचे अनेक प्रमुख कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते प्रवेशकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्यात आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. त्या विकास प्रवाहात सहभागी होण्यासाठी अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत. त्यानुसार रोडपालीतील कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी झाले. शेकापक्षातून दत्ता पगडे, अमर कान्हा भगत, प्रशांत सुरेश पाटील, रोशन नारायण भोईर, सूरज जनार्दन पाटील, अरविंद गोकुळ भोईर, प्रणय गोकुळ भोईर, राजेश नारायण भोईर, प्रविण म्हात्रे, आयुष हरिचंद्र पाटील, अमित कान्हा भगत, हेमंत धनंजय म्हात्रे, सचिन जनादर्न पाटील, अक्षय कान्हा भगत, मितेश गुरुनाथ पाटील, चेतन अशोक ठाकूर, हृतिक रोहिदास भोईर यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
या वेळी भाजपचे कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, माजी नगरसेवक संतोष शर्मा, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, जेष्ठ नेते अरुण पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply