Breaking News

महिला सक्षमीकरण हेच भाजपचे ध्येय -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
सर्वसामान्य नागरिकांचा सर्वांगीण विकास साधत त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात येत असून महिलांच्या हिताची काळजी घेणे ही भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
विचुंबे येथे दुर्गा माता महिला मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ विचुंबे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी भाजप महायुतीच्या पालीदेवद जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार प्राची अमित जाधव आणि विचुंबे पंचायत समिती गणाच्या उमेदवार नीलम प्रमोद भिंगारकर या दोन भगिनी सज्ज असल्याचे आवर्जून नमूद केले. या मेळाव्यात महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सरपंच प्रमोद भिंगारकर, बळीराम पाटील, अविनाश गायकवाड, अनिल भोईर, अनंत गायकवाड, विवेक भोईर, चेतन सुरते, श्रावणी भोईर, आरती गायकवाड, विभूती सुरते, प्रगती गोंधळी, स्वाती पाटील, भाग्यश्री भोईर, हर्षदा भिंगारकर, निकिता म्हात्रे, अमित म्हात्रे, कविता भोईर, प्राजक्ता भोईर, प्रमिला म्हात्रे, ज्योती भोईर, सोनम म्हात्रे, प्रणाली पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

केवाळे येथील पक्षप्रवेशामुळे भाजपची शक्ती आणखी वाढली -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्रातील मोदी सरकार सबका साथ, सबका विकास हे सूत्र राबवून प्रत्येक घराघरापर्यंत …

Leave a Reply