गुणकारी जांभळे झाली महाग; तरीही मागणी वाढली

उरण : वार्ताहर

उन्हाळा आला की थंडाव्यासाठी नागरिक अनेक उपाय योजतात. अंगाची लाही-लाही झाल्यावर थंडाव्यासाठी रानमेवा खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. उन्हाळ्यात उपलब्धता असणारा रानमेवा म्हणजे करवंदे, गुणकारी जांभळे, जाम, आंबे, अशा विविध प्रकारची रानमेवा खरेदी करताना नागरिक नाक्या-नाक्यावर दिसत आहेत.

मधुमेही रुग्णांसाठी टपोरी, काळीभोर जांभळे म्हणजे पर्वणीच, जांभळे मधुमेही रुग्णांसाठी फारच फायदेशीर व गुणकारी असल्याने जांभळे खरेदी करण्यासाठी खूपच गर्दी असते. जांभळे फक्त उन्हाळ्यात मिळतात. ती खाल्ल्यानंतर त्या बिया कडक उन्हात सुकवितात व त्या बारीक वाटून पावडर करून ठेवतात व मधुमेही रुग्ण ते पाण्यांत घेतात. त्यामुळे मधुमेही रुग्णांना एक पर्वणीच असते. त्यामुळे वर्षातून एकदाच मिळणार्‍या जांभळांची नागरिक विशेषतः मधुमेही रुग्ण वाट पाहतात, परंतु ती जांभळे ही चढ्या भावाने विकली जातात.उरण शहरात ठिकठिकाणी जांभळे विकली जातात, 200 रुपये किलो या भावाने आम्ही जांभळे विकतो, असे सखाराम दामगुडे यांनी सांगितले. यंदा मागणी कमी झालेली आहे. भाव महाग वाटत आहे, परंतु ज्यांना महत्त्व माहीत आहे ते नक्कीच खरेदी करतात. उरण तालुक्यातील चिरनेर, आवरे, दिघोडे, मोठी जुई, पाले, रानसई, पिरकोन येथून जांभळे विकणारे येतात.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply