Breaking News

बोर्लीत हॉटेल व्यावसायिकावर पर्यटकाचा प्राणघातक हल्ला

रेवदंंडा : प्रतिनिधी

बिल अदा न करता पळून जाणार्‍या पर्यटकाने फुटलेच्या  काचेच्या बाटलीने हल्ला करून हॉटेल मालकास गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (18 जून) बोर्ली येथे घडली. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोर्ली येथील कमाने हॉटेलमध्ये मंगळवारी सायकाळी पुणे येथील पर्यटक आले होते. खरेदी झाल्यानंतर हॉटेल मालक आतिश कमाने यांनी पर्यटक सोहम मल्हार काळे (रा. पुणे) यांच्याकडे बिलांच्या रक्कमेची मागणी केली. तेव्हा बिलाची रक्कम न देता सोहम काळे शिवीगाळ व दमदाटी करून पळून जाऊ लागले. त्यावेळी अतिश कमाने यांनी त्यांचा पाठलाग करून पकडण्यासाठी गेले असताना पर्यटक काळे यांनी हातातील फुटलेली बियरची काचेची बाटली हॉटेल मालक अतिश कमाने यांच्या डाव्या कानावर व गालावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. परिसरातील युवकांनी जखमी कमाने यांना लागलीच रूग्णालयात दाखल केले. या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ, स्वप्निल नाखवा आदींनी रेवदंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन हल्ला करणार्‍या पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी जखमी हॉटेल मालक आतिश कमाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पर्यटक सोहम काळे यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर करीत आहेत.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply